नशेसाठी फोडले ज्वेलर्सचे दुकान - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

बुधवार, ८ नोव्हेंबर, २०२३

नशेसाठी फोडले ज्वेलर्सचे दुकान

मुंबई, दि. ८ : नशेसाठी पैसे हवेत म्हणून ज्वेलर्सचे दुकान फोडणाऱ्या तिघांना खार पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. गुलाब गणेश मारवाडी, सूर्या नाडर आणि प्रयास केदार असे त्यांची नावे आहेत. 


त्या तिघांकडून ४० लाख ६९ हजार रुपयांचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. तक्रारदारांचे खार पश्चिम येथे ज्वेलर्सचे दुकान आहे. गेल्या आठवड्यात नेहमीप्रमाणे दुकान बंद करून ते घरी गेले असता चोरट्याने दुकानातील किचनच्या खिडकीची ग्रील वाकवून आत प्रवेश केला. 


दुकानातून ७३ लाख ८१ हजार रुपयांचे दागिने पळवन नेले. गुन्हा दाखल केल्यानंतर खार पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अविनाश नडवीनकेरी, उपनिरीक्षक प्रदीप पाटील आधी पथकाने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजवरून गुलाबला विलेपार्लेच्या नेहरूनगर मध्ये अटक केली. त्यानंतर सूर्य आणि प्रवेशला अटक केली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज