Ticker

6/recent/ticker-posts

दिवाळी फराळाचे आदिवासी पाड्यात वाटप

 लाडक्या लंबोदराचा एक अनोखा उपक्रम

मुंबई, दादासाहेब येंधे : काळाचौकी येथील रंगारी बदक चाळ रहिवाशी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे पालघर येथील विक्रमगड तालुक्यातील सारशी या आदिवासी पाड्यात शनिवार दिनांक ११ नोव्हेंबर २०२३ रोजी दिवाळीनिमित्त तेथील गरीब कुटुंबांना दिवाळीचा फराळ, कपडे आणि इतर जीवनाच्या साहित्य हे लाडके लंबोदराच्या आशीर्वादाने वाटप करून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करून आनंदाचे वाटप करण्यात येणार आहे. 


मंडळाचे अध्यक्ष संतोष सकपाळ, कार्याध्यक्ष रोहन सावंत, सरचिटणीस गणेश काळे व खजिनदार शंकर साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. तरी विभातील रहिवाशी बंधू भगिनींना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी आपल्याला न येणारे कपडे, लहान मुलांचे कपडे, खेळणी मंडळाच्या कार्यालयात ८ नोव्हेंबर पर्यंत आणून द्यावीत. कपडे देताना ते फाटलेले नसावेत. जेणेकरून ते आदिवासी पाड्यातील गरिबांना वाटण्यात येतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या