रेल्वे लोकल मधून चोरलेल्या २७.५ तोळे सोन्याचा बुध्दिकोशल्याने तपास करून आरोपीस बेड्या - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०२३

रेल्वे लोकल मधून चोरलेल्या २७.५ तोळे सोन्याचा बुध्दिकोशल्याने तपास करून आरोपीस बेड्या

सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांची उत्तम कामगिरी 

१०-११-२०२३

मुंबई, दादासाहेब येंधे :  तक्रारदार हे दि. ०२ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता मुंब्रा येथील दुकानातुन सोन्याचे दागिने असलेले पॅकबंद प्लॅस्टीकचा बॉक्स त्यावर २७२ ग्रॅम मार्करने लिहीलेले असा मुद्देमाल घेवुन ते तेथील दुकानातील पिशवीमध्ये ठेवुन रिक्षाने मुंब्रा रेल्वे स्टेशन येथे गेले. तेथुन १०.३० वाजताची परेल स्लो लोकल पकडून ठाणे रेल्वे स्टेशन येथे उतरले.  ठाणे रेल्वे स्टेशन फलाट क्र. ०६ वरुन १०.५० वा. च्या अंबरनाथ ते सीएसएमटी फास्ट लोकलच्या मधल्या फस्ट क्लास डब्यातुन प्रवास सुरु केला, त्यावेळी त्यांनी त्यांच्या हातातील सोन्याचे दागिने असलेली पिशवी रॅकवर ठेवुन उभे राहुन प्रवास सुरु केला. कुर्ला रेल्वे स्टेशन गेल्यानंतर त्यांना बसण्यास जागा मिळाल्याने ते सिटवर बसले. सदरची लोकल भायखळा रेल्वे स्टेशन येथे फलाट क्र. ०२ वर ११.४० वाजताच्या दरम्यान आली असता ते लोकल मधुन खाली उतरुन दादर बाजुकडील ब्रिज चढतेवेळी त्यांना १२,१५०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल असलेली पिशवी लोकलच्या रॅकवरच विसरल्याचे लक्षात आले. तोपर्यंत सदरची लोकल गाडी फलाटावरुन निघुन गेली होती. त्यानंतर त्यांनी स्टेशन मास्तर भायखळा यांच्याकडे जाऊन चौकशी केली असता त्यांनी सदरची लोकल परत टिटवाळा येथे जाण्याकरीता परत फलाट क्र. ०१ वर १२.०२ वा. येईल असे सांगितल्यावर तक्रारदार यांनी लोकल परत भायखळा येथे आल्यावर ते बसल्याजागी डब्यात चढुन त्यांच्या १२,१५०००/- रुपये किंमतीचा मुद्देमालाच्या पिशवीचा शोध घेतला. परंतु सदरच्या मुद्देमालाची पिशवी मिळुन न आल्याने त्यांनी पोलीस ठाणेत येवुन गुन्हा नोंदवला.

दाखल गुन्ह्यातील आरोपीचा व गहाळ मालाचा शोध घेत असताना पोउनि/ सांगळे यांच्या बातमीदाराने दिलेल्या खात्रिलायक माहीतीवरुन सदरचा इसम हा अंबरनाथ या ठिकाणी राहत असल्याचे समजले. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेचा स्टाफ सोबत घेवुन सरकारी वाहनाने दि.०८.११.२०२३ रोजी ००.४१ वा. गुप्त बातमिदारास घेवुन रवाना झाले व सदरच्या गुन्ह्यातील मुद्देमाल चोरी करणा-या इसमास बातमिदाराच्या मदतीने त्याचे राहते घरातुन जेरबंद केले.

गुन्हा करणा-या इसमास पोलीस ठाणेत आणुन त्याची माहिती विचारली असता त्याने त्याचे नाव अख्तर हुसैन मुस्तफा हुसैन शेख, वय ६२ वर्ष, व्यवसाय- रिक्षाचालक, राह- अंबरनाथ, जि. ठाणे. असे सांगितले. सदरच्या आरोपीस दि. ०८.११.२०२३ रोजी मा. न्यायालयाच्या समक्ष हजर केले असता न्यायालयाने ०२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त सो, श्री. रविंद्र शिसवे सो, लोहमार्ग, मुंबई. यांच्या निर्देशानुसार व पोलीस उप-आयुक्त सो, श्री.मनोज पाटील सो, सहा. पोलीस आयुक्त श्री.सुनिल गावकर यांच्या मार्गदर्शनानुसार व सुचनांनुसार वपोनि/ विजय तायडे, पोलीस निरीक्षक गुन्हे / श्री.प्रदिप साळुंखे, सहा. पोलीस निरीक्षक/ श्री.सतिष शिरसाठ, पोलीस उप-निरीक्षक/ सांगळे व रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी आरपीएफ सहा.उप-निरीक्षक/ एकनाथ गडघे व सीपीडीएस टिम तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोहवा/९३१ खंडु मानेरसुरे, पोहवा/०४ प्रसाद चव्हाण, पोलीस नाईक/ २१४२ नितीन पवार, पोना/२२४९ सचिन आव्हाड, पोशि/४४४ परशुराम रेवगडे,पोशि/११२४ सागर रननवरे,पोशि/५७६ सुरज भारुड,पोशि/१५२६ महेश चव्हाण, पोशि/ २०५ निलेश गायकवाड,पोशि/ ९११ तुळशिराम नरळे, यांनी केली असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक/ ए.बी.सांगळे हे सविस्तर तपास करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज