बँक, फायनान्स कंपनीची फसवणूक
मुंबई, दि. ६: कोल्हापूर आणि पुण्यात इंजीनियरिंगचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर २०१४ पासून बेरोजगार झालेल्या तरुणांने थेट बनावट कागदपत्राद्वारे विविध बँक, फायनान्स कंपनीतून वाहन कर्ज घेत फसवणुकीचा धंदा सुरू केल्याचे धक्कादायक घटना मरीन ड्राईव्ह पोलिसांच्या कारवाईतून समोर आली आहे. सचिन मल्लिकार्जुन विल्लूर (४८) असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्याकडून २३ वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच आणखीन तीन महागड्या वाहनांचा शोध घेण्यात येत आहे.
तक्रारदार हे नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपनीचे सेक्रेटरी आहेत. त्यांचे कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर हे बाजारातील दुचाकी किंवा विक्रेते यांच्याशी संपर्कात राहतात. सेल्स एक्झिक्युटिव हे ग्राहक कर्ज परत फेडीबाबत तपासणी करतात. त्यानंतर ग्राहकाच्या कस्टमर लीन अग्रीमेंट भरून त्यावर स्वाक्षऱ्या घेऊन आवश्यक कागदपत्रे कंपनीकडे पाठवले जातात. त्यानुसार कर्ज मंजूर झाल्यानंतर कर्जाची रक्कम तक्रारदार कंपनीकडून जमा केली जाते. हे व्यवहार झाल्यानंतर वाहन विक्रेते डीलरकडून ग्राहकाला त्याने केलेल्या मागणीप्रमाणे वाहन देतात. सचिनने त्याच्या उच्च शिक्षणाचा गैरफायदा घेत बनावट कागदपत्रांवरे विविध बँक, फायनान्स कंपन्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली. बनावट वाहन कर्जाच्या आधारे वाहन खरेदी केल्यानंतर ते वाहन तो परस्पर अन्य ग्राहकांना विकत होता.
सचिन हा नवी मुंबईत राहायचा. कर्जाचे हफ्ते न भरल्याने संबंधित बँक कर्मचारी त्याने दिलेल्या पत्त्यावर जायचे. मात्र, तो भेटत नव्हता. ना वाहन त्यांना मिळत होते. अखेर त्यांनी पोलिसांना धाव घेऊन तक्रार केली. त्यानुसार पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मरीन ड्राइव पोलीस करण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बागुल, तपास अधिकारी गोंदूराम बांगल (गुन्हे), राकेश शिंदे, Pending सतीश सांगळे, नंदू कराटे, रामेश्वर लोंढे, कृष्ण सांगळे या पथकाने तांत्रिक पुरावांच्या मदतीने आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
0 टिप्पण्या