Ticker

6/recent/ticker-posts

नौदलाच्या संकट सज्जतेची प्रचिती

मुंबई, दि. ४ : सागरी युद्ध पद्धतीसह आंतरराष्ट्रीय सुरक्षेची सातत्याने बदलणारी स्थिती शत्रू राष्ट्राच्या युद्ध नौकांचा भारताच्या २० सागरी मैल अंतरावरील सामूहिक सीमेजवळून वाढता वावर अशा पार्श्वभूमीवर नौदलाच्या युद्धनौका प्रत्येक संकटासाठी सज्ज आहेत. एकाच वेळी आठ युद्धनौका, पाणबुडी, दोन हेलिकॉप्टर आणि गार्नियर विमानाने अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे अचूक समन्वयाचे सादरीकरण करीत खोल समुद्रात कसरतीद्वारे युद्ध आणि संकट सज्जतेची वाढवली. 

नौदलाच्या पश्चिम कमांडकडून शुक्रवारी खोल समुद्र प्रात्यक्षिकांचे विशेष आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी 'आयएनएस विपुल' या क्षेपणास्त्रवाहू युद्ध नौकेवरून वरून शत्रूवर जलद हल्ल्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या