आंतरराज्यीय टोळीचा झाला पर्दाफाध
मुंबई, दि. ४ : परदेशी नोकरीच्या बेरोजगार तरुणांना लक्ष करत फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. यामध्ये ३० ते ४० जणांची फसवणूक करत भामटे कार्यालयाला टाळे ठोकून पसार झाले होते. या प्रकरणी एम आर एम मार्ग पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. गुन्हे शाखेने या कारवाईत पाच जणांना अटक केली आहे.
ट्रॉमबे येथील रहिवासी असलेले भरत कोळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,अमितोश श्रवणकुमार गुप्ता, भिवंडीतील फैजान अहमद फारुख अहमद शेख, शेख मन्सुरी मोहम्मद, रामकृपाल रामसेवक कुशवाह यांच्यासह दलाल प्रमोद कुमार, शुभम सिंह, अरुण सिंह, अजय चौहान श त्यांचा बॉस आणि अन्य कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. आरोपीने एमआरएम पोलिसांच्या हद्दीतील शहीद भगतसिंग रोड परिसरात कार्यालय थाटले होते. आरोपीने १९ जून २०२३ ते २९ ऑक्टोबर दरम्यान ही फसवणूक केली आहे.
तांत्रिक पुरावांच्या मदतीने आंतरराष्ट्रीय टोळी दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, भिवंडी व मुंबई येथून आपसात संगणमत साधून सक्रिय असल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलीस आयुक्त लखमी गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण पाच पोलीस पथके स्थापन करण्यात आली होती. त्यांना दिल्ली, जिल्हा लखनऊ, राज्य उत्तर प्रदेश, जिल्हा गया, राज्य बिहार, भिवंडी, महाराष्ट्र येथे पाठवण्यात आले. या प्रत्येकाने आरोपींचा शोध घेऊन नमूद ठिकाणाहून पाच आरोपींना अटक केली आहे. रामकृपाल रामसेवक कुशवाह, रोहित महेश्वर सिन्हा, आशिष कुमार महातो, अमितेश गुप्ता आणि राहुल कुमार चौधरी अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.
अंधेरीत नवीन कार्यालय थाटले...
या टोळीने बेरोजगार तरुणांना लक्ष केले होते. आरोपींच्या चौकशीत मुंबईतील अंधेरी सहार परिसरात अशाच प्रकारे खोट्या नवीन नावाने विनापरवाना एजन्सी चालवून अशाच प्रकारचा गुन्हा करत असल्याचे तपासात निष्पन्न होटच तेथेही छापा टाकून पुढील फसवणूक टाळण्यास पोलिसांना यश आले आहे.
0 टिप्पण्या