मुंबई, दि. २१ : कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना देखील रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरला क्राईम ब्रँच युनिट-६ ने नुकत्याच बेड्या ठोकल्या आहेत. अल्ताफ हुसेन निजाम खान असे त्याचे नाव आहे. खानचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून तो गेल्या पाच सहा वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत होता.
शहरात वैद्यकीय परवाना नसतानाही रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या होत्या. गोवंडीच्या बैंगनवाडी येथे एकजण वैद्यकीय परवाना नसतानाही रुग्णांवर उपचार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीनुसार युनिट-६ चे पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे यांच्या पथकाने गोवंडीच्या रफीनगर येथे सापळा रचून तेथे एका दवाखान्यात पोलीस गेले, तेव्हा अल्ताफ हा रुग्णांची तपासणी करत होता. पोलिसांनी अल्ताफ याला ताब्यात घेतले आहे.
अल्ताफ याच्याकडे वैद्यकीय परवाना बाबत विचारणा केली असता तेव्हा त्याच्याकडे कोणताही परवाना नव्हता. अल्ताफचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. तो गेल्या पाच सहा वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत होता. अल्ताफ विरोधात पोलिसांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
0 टिप्पण्या