रंगारी बदक चाळ गणेशोत्सव मंडळातर्फे गरीबांना कपडे व फराळाचे वाटप - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शनिवार, ११ नोव्हेंबर, २०२३

रंगारी बदक चाळ गणेशोत्सव मंडळातर्फे गरीबांना कपडे व फराळाचे वाटप

लाडक्या लंबोदराच्या आशीर्वादाने यावर्षी मंडळाने आदिवासींसोबत केली दिवाळी साजरी... 

११-११-२०२३

मुंबई, दादासाहेब येंधे : रंगारी बदक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव  मंडळाच्या विद्यमाने शनिवार दिनांक ११ नोव्हेंबर २०२३ रोजी दिवाळी निमित्त  मु. सारशी पो. तलवाडा ता. विक्रमगड. जिल्हा पालघर येथील आदिवासी पाड्यात जाऊन तेथील गरीब कुटुंबांना फराळ साहित्य (रवा, मैदा, साखर, बेसन, डालडा, तेल), ब्लँकेट, नारळ, बिस्कीट, खेळणी आणि कपडे वाटप करून सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.


या कार्यक्रमामुळे सदर पाड्यातील लोकांचा आनंद आणि उत्साह हा त्यांच्या बोलण्यातून दिसून आला. सदर कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष  संतोष सकपाळ, सरचिटणीस गणेश काळे, खजिनदार  शंकर साळवी तसेच तेथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते किरण पंडित, ग्राम पंचायत सदस्य, प्रकाश गिंभल, भारती सापटा, पोलीस पाटील रमेश खांजोडे, शिक्षक मनोज कुऱ्हाडा तसेच मंडळाचे पदाधिकारी श्याम आचरेकर, मंगेश पिंपरकर, बाळा खोचरे, राजू माणगावकर, अशोक भास्कर, प्रकाश सकपाळ, प्रसाद सावंत, संदीप तुपे, संदीप सकपाळ आणि राजा मंचेकर आदी उपस्थित होते. समस्त सारशी ग्रामस्थांनी मंडळाचे आभार मानले यावेळी आभार मानले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज