एक दिवाळी कॅन्सर रुग्णांसोबत - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

सोमवार, १३ नोव्हेंबर, २०२३

एक दिवाळी कॅन्सर रुग्णांसोबत

कॅन्सरग्रस्त मुलांच्या जीवनात भरला
दिवाळीचा आनंद...

१३-११-२०२३

मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबईतील सामाजिक क्षेत्रात अग्रगन्य असणाऱ्या जीवन प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने सलग १३व्या वर्षी संस्थापक श्री. सत्यवान नर यांच्या मार्गदर्शनाखाली काळाचौकी येथील मम्माबाई हायस्कुल हॉल येथे कर्करोगग्रस्त मुलांसोबत "सामाजिक जाणीवांची एक आगळी वेगळी दिवाळी साजरी करण्यात आली. 


या कार्यक्रमात कॅन्सरग्रस्त मुलांसाठी जादूचे प्रयोग व मुलांसाठी विविध खेळ खेळून हा कार्यक्रम पार पडला. तसेच त्या नंतर मुलांसाठी आकर्षक भेट वस्तू व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी सेंट जॉर्ज हॉस्पिटल - दंत चिकित्सा विभाग यांच्या वतीने दंत चिकित्सा शिबीर देखील पार पडले. 


या कार्यक्रमास लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाचे मानद सचिव श्री. सुधीर साळवी, उद्योजिका सौ. समीक्षा जाधव-उतेकर, रंगारी बदक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे विश्वस्त श्री. संजय कारेकर, कल्पतरू समूहाचे संस्थापक श्री. चंद्रशेखर साळसकर, स्त्री उद्योग वर्धिनी मुंबईच्या अध्यक्षा श्वेता सरवणकर, जे. जे. ब्लड बैंक व्यवस्थापक श्री. अजय भिसे, सेंट जॉर्ज हॉस्पिटल - दंत चिकित्सा विभागाचे डॉ. महेंद्रसिंग चव्हाण व डॉ. सोनाली आव्हाड, टाटा हॉस्पिटल मधील संयोजक व रुग्ण मित्र, श्री. मंगेश राणे, सतिश कार्लेकर, बाजीराव तुपे आदी मान्यवर उपस्थित होते.


या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना श्री. सुधीर साळवी म्हणाले की, आपण आपले कुटुंब नातेवाईक मित्रांबरोबर नेहमीच रमतो. पण कर्करोगसारख्या आजाराशी लढणाऱ्या मुलांच्या आयुष्यात असे क्षण क्वचितच येत असतील. अनाथ मुलांना सहानभुती व आधाराची गरज असते. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे काही देण लागतो ह्या भावनेने अनाथ मुलांच्या आयुष्यात श्री. सत्यवान नर व त्यांची जीवन प्रबोधिनी ट्रस्ट च्या माध्यमातून दिवाळी निमित्ताने का होईना दोन क्षण सुखाचे देण्याचा करत असलेला प्रयत्न खरंच कौतुकास्पद आहे असे बोलून संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच सामाजिक क्षेत्रात काम करताना कोणतीही गरज लागली तर लालबागचा राजा ट्रस्ट आपल्या मदतीला नेहमी तत्पर असे आश्वासन दिले. ह्या सर्व मान्यवरांसोबत संस्थेचे अध्यक्ष अमित पवार, सरचिटणीस हेमंत मकवाना, खजिनदार गणेश क्षीरसागर, संयोजक गणेश पार्टे, प्रशांत पवार व संस्थेचे सहकारी कार्यकर्ते प्रविण पावसकर, सुशांत नाईक, रवी जाधव, विनायक येंधे, नागेश तांदळेकर, गणेश काळे, राजन आंबेरकर, संदीप सकपाळ, आदि संस्था सदस्य उपस्थित होते. अशी माहिती जीवनप्रबोधिनी ट्रस्टचे संस्थापक सत्यवान नर यांनी दिली आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज