मुंबई, दि. ४ : लग्न होत नसल्याच्या तणावात एका कुकने थेट, दोन पाकिस्तानी नागरिक समुद्रमार्गे मुंबई येथेत ताज हॉटेल उडवणार असल्याचा खोटा कॉल केल्याचे पोलीस तपासासमोर आले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने कुक जगदंबा प्रसाद सिंग (वय, ३६) याला अटक केली आहे.
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात गुरुवारी एक कॉल आला. कॉल करणाऱ्याने त्याचे नाव मुकेश सिंग सांगून उत्तर प्रदेश येथून बोलत असल्याचे सांगितले. त्याच्या फेसबुक खात्यावर उर्दू भाषेत पोस्ट मिळाली. त्या पोस्टमध्ये दोन पाकिस्तानी नागरिक समुद्र मार्गे मुंबईत येऊन ताज हॉटेल उडविणार असल्याचे सांगून त्याने कॉल कट केला. मात्र, कॉल मुंबईतून आल्याचे समजताच तो खोटा असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवत पोलिसांनी तपास सुरू केला होता.
गुन्हे शाखेच्या कक्ष-९ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास सुरू केला असता तांत्रिक पुरावांच्या मदतीने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याने नावही खोटे सांगितले होते. चौकशीत त्याचे नाव जगदंबा असल्याचे स्पष्ट झाले. लग्न जुळत नसल्याने तणावातून हा कॉल केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा