सहाय्यक उपनिरीक्षक व तीन प्रवाशांचा मृत्यू
मुंबई, दि १ : जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमधील एका शस्त्रधारी सुरक्षा कर्मचाऱ्याने धावत्या एक्सप्रेसमध्ये काल सोमवारी बेछूट गोळीबार केला. या घटनेत सुरक्षा दलाचे सहाय्यक उपनिरीक्षक टीकाराम मीना तसेच अन्य तीन प्रवाशांचा मुत्यू झाला. याप्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाचा (आरपीएफ) शिपाई चेतन सिंग याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

गाडी क्रमांक १२९५६ जयपूर-मुंबई सेंट्रल एक्सप्रेस मधील प्रवाशांना सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी पश्चिम रेल्वे आरपीएफ च्या दादर ठाणे कडे सोपवण्यात आली आहे. दादर ठाण्यातील सहाय्यक उपनिरीक्षक टीकाराम मीना यांच्या नेतृत्वाखाली परळ वर्कशॉप मध्ये नियुक्त हवालदार नरेंद्र परमार, शिपाई अमेय आणि चेतन सिंग यांच्या पथकाला मुंबई सेंट्रल-सौराष्ट्र मेल मधून रवाना करण्यात आले. सुरत स्थानकात पथकाने जयपुर एक्सप्रेस मध्ये प्रवेश करत सुरक्षा गस्त सुरू केली.

एएसआय यांच्यासोबत असलेल्या चेतन सिंग याची तब्येत ठीक नसल्याचा संदेश वलसाड नियंत्रण कशाला देण्यात आला. वलसाड मध्ये पर्यायी कर्मचारी देण्याची तयारी केली. मात्र, मी तंदुरुस्त असून ड्युटी करण्यास तयार आहे असे शिपाई चेतनने सांगितले. त्यानंतर गाडी रवाना करण्यात आली. पालघर-विरार दरम्यान गाडी पोहोचल्यानंतर चेतननने त्याच्याकडील एके ४७ मधून तीन डब्यांमध्ये गोळीबार केला. यात एएसआय मीना यांच्यासह अजगर अब्बास शेख, अब्दुल कादरभाई मोहम्मद हुसेन, भानपुरवाला या प्रवाशांचा मृत्यू झाला. तिसऱ्या मृत प्रवाशाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे असे रेल्वे पोलीससांनी सांगितले.
मीरा रोडच्या दहिसर दरम्यान गाडीतील एस-५ डब्यातील आपत्कालीन साखळी ओढून चेतन याने गाडी थांबवली. यावेळी त्याने पुन्हा गोळीबार करत रायफल तिथेच टाकली आणि पळण्याच्या प्रयत्न केला. मात्र, रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी चैतन पकडले. असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
0 टिप्पण्या