Ticker

6/recent/ticker-posts

सायबर गुन्हे रोखण्यासाठी १३ ठिकाणी 'सायबर सेल'

मुंबई : सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई पोलिसांकडून परिमंडळ स्तरावर १३ ठिकाणी सायबर सेल सुरू करण्यात आले आहेत. शुक्रवारी पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फसन्सद्वारे या सेलचे उद्घाटन करण्यात आले.

आझाद मैदान येथील प्रेरणा हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. या वेळी विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती, पोलिस सहआयुक्त सत्यनारायण, अपर पोलिस आयुक्त अभिनव देशमुख, यांच्यासह स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक जी. एस. राणा, तसेच पोलिस अधिकारी उपस्थित होते. मुंबई पोलिसांच्या सायबर शिल्ड प्रकल्पांतर्गत याची सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे गुन्हेगारी रोखण्यास मदत होईल. 


अधिकारयांसह अंमलदार नियुक्त होणार

प्रत्येक परिमंडळात सायबर सेल स्थापन करण्यात आल्यामुळे सायबर गुन्ह्यांना आळा बसणार असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. या सेलमध्ये एक पीएसआय आणि चार अंमलदार कार्यरत राहणार आहेत.



Press note

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या