तीस वर्षांपूर्वीच्या हत्येतील प्रमुख आरोपीला अटक - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

रविवार, १८ जून, २०२३

तीस वर्षांपूर्वीच्या हत्येतील प्रमुख आरोपीला अटक

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष-९ ने विक्रोळीत केली धाडसी कारवाई


मुंबई, दि. १८ : तीस वर्षांपूर्वी बंगल्यात चोरी करण्यासाठी गेलेल्या आणि बंगल्यातील दांपत्याची निर्घृण हत्या करून फरार झालेल्या अविनाश पवार (वय, ४९) या प्रमुख आरोपीला शुक्रवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पकडले आहे


लोणावळ्याच्या सत्यम सोसायटीतील यशोदा बंगल्यात पवार आणि त्याचे दोन साथीदार अमोल काळे व विजय देसाई यांनी ४ ऑक्टोबर १९९३ रोजी धनराज ठाकरसी कुरवा ( वय,५५) व त्यांच्या पत्नी धनलक्ष्मी (वय, ५०) यांची दोरीने गळा आवळून नंतर धारदार शास्त्राने भोसकून हत्या केली होती. यातील काळे व देसाई या दोघांना त्यावेळी लोणावळा पोलिसांनी अटक केली होती. मात्र, पवार हा फरार होता.


गुन्हे शाखेच्या कक्ष ₹-९ चे प्रभारी पोलीस निरीक्षक दयानंद नायक यांना खबऱ्यांमार्फत पवार बाबत टीप मिळाली होती की अविनाश पवार जो स्वतःचे नाव ओळख लपवून समाजात वावरत आहे. नायक यांच्या पथकाने विक्रोळी पूर्वच्या टागोर नगर मधून त्याला अटक केली..


वर्ष कुठे फरार होता आरोपी?


अविनाश पवार ने हत्या केल्यानंतर त्याच्या अन्यसाथीदारांसह तो दोन दिवस शिर्डीला व त्यानंतर पुन्हा दोन दिवसांसाठी तो लोणावळ्याला गेला. तेथून तो दिल्लीला जाऊन वर्षभर हॉटेलमध्ये काम करत होता. त्यानंतर १९९५ मध्ये तो कसारा परिसरात येऊन १९९६ पर्यंत त्याने गॅरेज मध्ये काम केले. पुढे १९९७ ते १९९८ मध्ये अहमदनगर येथे ड्रायव्हिंग व हॉटेलमध्ये काम केले. १९९९ मध्ये त्याने विक्रोळीतील प्रमिला तिच्याशी प्रेमविवाह केला होता.


Press note

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज