Ticker

6/recent/ticker-posts

बंदुकीचा धाक दाखवून वृद्धेला लुबाडले

चालकाने रचला कट, दोघांना बेड्या


मुंबई, दादासाहेब येंधे  : झवेरी बाजारातील ईडीचा अधिकारी असल्याचे सांगून लुटीची घटना ताजी असतानाच, दादरमधील गजबजलेल्या अशा कीर्ती कॉलेजजवळील हाउसिंग सोसायटीत भरदिवसा रिव्हॉल्व्हरच्या धाकात एका वृद्धेच्या घरात करण्यात आलेल्या लुटीच्या घटनेने खळबळ उडाली आहे.  धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्याकडे चालक म्हणून काम करणाऱ्या नोकरानेच मित्राच्या मदतीने ही लूट केली असल्याचे उघड झाले आहे. 




याप्रकरणी दादर पोलिसांनी चालक संतोष भागोजी कडव (३८) याच्यासह त्याचा नवी मुंबईतील साथीदार किसन ऊर्फ कृष्णा रामचंद्र भुवड ऊर्फ भौड (५२) यालाही अटक केली आहे.


 दादर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश मुगुटराव यांच्या नेतृत्वात तपास अधिकारी विजय कदम, रामकृष्ण सागडे, भगवान पायघन, राजेंद्र रावराणे यांच्या पथकाने गुन्ह्याची उकल केली आहे. 


दादर येथील काशिनाथ धुरू मार्गावरील एका इमारतीच्या आठव्या मजल्यावर ७० वर्षीय वयोवृद्धा पतीसोबत राहतात. सोमवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास त्यांच्या दरवाजाची बेल वाजली. वयोवृद्धा यांनी दरवाजा उघडताच समोर अनोळखी व्यक्ती उभा असल्याचे त्यांना दिसले. तेथे आदल्याच दिवशी सोसायटीतील रायकर नावाच्या रहिवाशाने नातीच्या जन्माबद्दल मिठाई वाटली होती. त्यांनीच पुन्हा मिठाई पाठविल्याचे सांगून त्या व्यक्तीने घरात प्रवेश केला. वयोवृद्धेने सेफ्टी दरवाजा उघडताच त्या व्यक्तीने घरात घुसून वयोवृद्धेचा गळा दाबला. पिस्तूल डोक्याला लावत दागिन्यांची विचारणा केली. सुमारे १० ते १२ लाख रुपये किंमतीचे २० ते २४ तोळे वजनाचे दागिने काढून घेतले. त्यांना एका खुर्चीवर बसवून त्यांचे हातपाय बांधून पळ काढला. पोलिसांनी आपला खाक्या दाखविताच आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला. 




Press Note

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या