Ticker

6/recent/ticker-posts

मोर्चात घुमला हिंदू जन आक्रोश

मुंबई, दि. ३० : लव्ह जिहाद, लँड जिहाद व धर्मांतरणविरोधी कायदा राज्यसह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या नेतृत्वाखाली रविवारी सर्व हिंदू संघटनांकडून जनअक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोर्चात एक लाखाहून अधिक लोकांनी सहभाग घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. 




सकल हिंदू समाजातर्फे काढण्यात आलेल्या जन आक्रोश मोर्चामध्ये विविध उत्सव मंडळ, समित्या तसेच जनहितासाठी कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेतला होता. रविवारी सकाळी दहा वाजता सर्व मोर्चेकरी शिवाजी पार्क येथे जमा झाले तेथून प्रभादेवीतील कामगार मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चा शांततेत निघाला.  लव्ह जिहाद, लँड जिहाद तसेच धर्मांतरणविरोधी कायदा सर्वत्र लागू व्हावा ही मोर्चाकरांची मुख्य मागणी होती. मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या