Ticker

6/recent/ticker-posts

दोन दिवस अर्धी मुंबई राहणार तहानलेली

मुंबई, दि.२९ : भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रासाठी रिक्त ४००० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम महानगरपालिकेद्वारे हाती घेण्यात येणार आहे. तसेच भांडुप संकुलाशी संबंधित असलेल्या विविध जलवाहिन्यांवर दोन ठिकाणी झडपा बसविणे, नवीन जोडणी करणे आणि दोन ठिकाणी उद्भवलेली गळती दुरुस्त करणे इत्यादी कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यामुळे मुंबईतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार असून तब्बल अर्ध्या मुंबईला पाणी मिळणार नाही. 


या कामांमुळे ३० जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी ३१ जानेवारी २०२३ रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत पालिकेच्या २४ विभागांपैकी १२ विभागातील पाणीपुरवठा पूर्णतः बंद असणार आहे तर दोन विभागातील पाणीपुरवठ्यात २५ टक्के कपात करण्यात येणार आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी दिली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या