Ticker

6/recent/ticker-posts

निवासी डॉक्टरांचा संप

मुंबई, दि.३ : निवासी डॉक्टरांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी राज्यभरात सुरू केलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनामुळे मुंबई सह राज्यभरात रूग्णसेवा विस्कळीत झाली. मुंबईतील दोन हजार डॉक्टरांसह राज्यभरातील सहा हजार डॉक्टर आंदोलनात सहभागी झाल्यामुळे ओपीडी आणि ऑपरेशनवर याचा मोठा परिणाम झाला. निम्मी ऑपरेशन पुढे ढकलावी लागली. फक्त अत्यावश्यक सेवा सुरू होती. दरम्यान आंदोलन लांबल्यास रुग्णसेवा कोलमडण्याचे भीती व्यक्त केली जात आहे.

निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या 'मार्ड'ने डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा काम बंद आंदोलन करण्याचा इशारा चार दिवसांपूर्वी दिला होता. यावर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने मुंबईसह राज्यभरात आंदोलन सुरू झाले. या संपाला मुंबई महापालिकेतील के.ई.एम, नायर व सायन रुग्णालयातील सुमारे दोन हजार निवासी डॉक्टरांनी पाठिंबा देत संपात सहभागी झाले आहेत. तर जे जे रुग्णालयातील ५०० डॉक्टरही सहभागी झाल्याने रुग्णसेवेवर मोठा परिणाम झाला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या