Ticker

6/recent/ticker-posts

जल्लोषात नववर्षाचे स्वागत

मुंबई, दि. १ : सरत्या वर्षाला निरोप देत नवंवर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी शनिवारी मुंबईसह उपनगरांमधील महत्त्वाची ठिकाणे गर्दीने अक्षरशः भरून गेली होती. नागरिक मोठ्या संख्येने किनारपट्ट्या, हॉटेल, रेस्टॉरंट, रिसॉर्ट मध्ये दाखल झाले होते. कोरोनाचे सावट दूर झाल्याने लोक मुक्त वातावरणात मित्र-मैत्रिणी, कुटुंबियांच्या सोबत नववर्षाचा जल्लोष साजरा करत होतोहोते. गेट ऑफ इंडियावरही नागरिकांच्या उत्साहाला उधाण आले होते. उत्सवाच्या वातावरणात पालिकेने रोषणाईने उजळविलेले रस्ते जल्लोषात अधिकच भर घालत होते. त्यामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण तयार झाले होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या