मुंबई, दि. ९ : हद्दपार केलेले आरोपीनेच साथीदारांच्या मदतीने पायधुनीमध्ये एका कार्यालयाच्या खिडकीचे कुलूप तोडून चोरी केल्याचे पोलीस तपासात नुकते स्पष्ट झाले आहे. आरोपीविरोधात घरफोडीचे नऊ गुन्हे दाखल असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला एप्रिल महिन्यात एका वर्षासाठी मुंबईतून हद्दपार केले होते. त्याच्या जवळून १०,१०० रुपयांची रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले काही साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. तक्रारदाराच्या दुकानात सहा डिसेंबरच्या रात्री घुसलेल्या लुटारुंनी रोख रक्कम चोरी करून पळ काढला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी चोरीची घटना उघडकीस आली. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पायधुनी पोलिसांनी येथील सीसीटीव्ही फुटेच्या मदतीने गुन्ह्याचा तपास सुरू केला. पोलीसांनी अभिलेखावरील सराईत हद्दपार आरोपीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती शोधून काढली. त्यानुसार पोलिसांनी पीडिमेलो रोड येथे सापळा रचून अवघ्या बारात तासांच्या आत आरोपीला अटक केली.
Press note
0 टिप्पण्या