मुंबई, दादासाहेब येंधे : गेल्या चार ते पाच वर्षांत शेकडो हॉटेल्स, मेडिकल, किराणा दुकानदारांना अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणचे अधिकारी बनून पैसे उकळणाऱ्या दोघांना कस्तुरबा मार्क पोलिसांनी सोमवारी अटक केली. यात मास्टरमाइंड हा प्राधिकरणाच्या माजी अधिकाऱ्यांचे नाव वापरत हा गुन्हा करत असताना तक्रारदार हॉटेल चालकांनी बनावट अधिकाऱ्याला ओळखले आणि ही फसवणूक उघडकीस आली. या दोघांना अवघ्या सहा तासात कस्तुरबा पोलिसांनी अटक केली आहे.
वर्धन रमेश साळुंखे उर्फ अविनाश गायकवाड आणि धर्मेंद्र शिंदे अशी अटक केलेल्या दोघांचे नावे असून यात साळुंखे हा दहावी नापास तर त्याचा सहकारी शिंदे हा बारावी शिकलेला असून दोघेही कांदिवली पूर्व परिसरात राहतात. ४ डिसेंबर रोजी या दोघांनी बोरवलीतील सेंट्रल प्रभू हॉटेलचे तेजस हेगडे आणि आरोही हॉटेलचे व्यवस्थापक तंगमणी केरमडा यांच्याकडून चार ते पाच हजार रुपये उकळले. मात्र, तिसऱ्या ठिकाणी गेल्यावर साळुंके हा गाडीत बसून होता. तर शिंदे याने जाऊन साहेब बाहेर बसले आहेत असे सांगत पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हॉटेल चालक भेटायला आला आणि तो अधिकारी नसून भामटा असल्याचे लक्षात आले. तेव्हा आरोपीने तेथून पळ काढला.
0 टिप्पण्या