Ticker

6/recent/ticker-posts

सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाणेतर्फे जनजागृती

पोष्टर हाती घेऊन नशा न करण्याचा सल्ला


मुंबई, दादासाहेब येंधे : शनिवार दि. ३१ डिसेंबर रोजी नवीनवर्षे पूर्व संध्या तसेच ०१ जानेवारी २०२३ रोजी नवीन वर्ष पहाट साजरी होणार आहे. त्यानिमित्ताने  रेल्वे प्रवाशांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाणे यांचेकडून विविध उपक्रम राबविण्यात आले.

 


त्या अनुषंगाने काल दि.३०/१२/२०२२ रोजी दुपारी  ३ वाजेपर्यंत सीएसएमटी रेल्वे टर्मिनस व रेल्वे स्टेशन येथे रेल्वे प्रवाशांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने लोकल लाईनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ नशामुक्ती बाबत पोस्टर, स्टँडी, फलक लावण्यात आले होते. तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी जनजागृती रॅली काढली होती. त्यामध्ये पोलीस अंमलदार यांच्या हाती दारूबंदीचे संदेश फलक होते. तसेच मेगा फोनद्वारे प्रवाशांना पुढील प्रमाणे सूचना व मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात येत होती. 


१) रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.२) नवीन वर्षाचे स्वागत नवीन संकल्प करून जास्तीत जास्त वाचन व्यायाम योगा करून जीवन सुदृढ बनवूया.३) नवीन वर्षाचे स्वागत करताना कोणीही मद्य प्राशन तसेच इतर अमली पदार्थांचे सेवन करू नये.४) कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून कोणताही खाद्य पदार्थ किंवा पेय खाण्यापिण्यास स्वीकारू नये. त्यात गुंगीचे पदार्थ असण्याची शक्यता असून त्यामधून तुमच्या जीवितास व मालमत्तेस धोका होऊ शकतो. ५) महिलांनी रात्रीच्या वेळेस शक्यतो महिलांसाठी असलेल्या राखीव डब्यातूनच प्रवास करावा.कारण त्यामध्ये पोलिसांची नेमणूक केलेली असते.६) रेल्वे  प्रवाशांना काही अडचण अथवा काही संशयित इसम, संशयास्पद हालचाली, संशयित सांभाषण आढळून आल्यास कृपया त्यांनी १५१२ या रेल्वे पोलीस हेल्पलाइनवर संपर्क साधावा. ७) रेल्वे रुळ ओलांडू नये. रेल्वे पुलाचा वापर करावा.८) रेल्वे प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंची/सामानाची काळजी घ्यावी. अशा आशयाच्या उदघोषणा करण्यात आल्या.



सदर कार्यक्रमाकरिता पीएसआय नष्टे तसेच १२ पोलीस अंमलदार उपस्थित होते. अशी माहिती सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाणेचे प्रभारी पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी दिली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या