मुंबई, दि. २९ : मुंबईत कोरोनाचा उद्रेक झाल्यास आरोग्य सुविधांची सज्जता आहे का? याची चाचपणी करण्यासाठी देशातील अनेक रुग्णालयात मंगळवारी उपाययोजनांची रंगीत तालीम (मॉक ड्रिल) घेण्यात आली. वैद्यकीय उपकरणे आणि मानवी संसाधनांच्या तयारीचा आढावा घेणे महत्त्वाचे होते असे केंद्र आरोग्य मंत्री महसूल मांडवे यांनी याबाबत बोलताना नमूद केले.
इतर देशांमध्ये कोरोना रुग्ण वाढले असल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून कोरोना उपयोजनापूर्व तयारीची खातरजमा करण्याचे निर्देश केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेचे अंधेरीतील सेवन हिल्स रुग्णालय तसेच जे जे रुग्णालयात कोरोना उपचार व्यवस्था यंत्रणा सुसज्जता आणि इतर उपाययोजनांची तालीम मंगळवारी घेण्यात आली.




0 टिप्पण्या