मुंबई, दादासाहेब येंधे : मध्यप्रदेशातील एका कापड व्यापाऱ्याची फसवणूक करून आंगडीया मार्फत पाठवलेल्या वीस लाख रुपयांचा अपहार करणाऱ्या राजस्थानच्या कुमावत टोळीचा दिंडोशी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी विक्रम अचलाराम कुमावत, मुकेश कुमावत, हसमुख सुराणा, मोहनलाल कुमावत आणि विक्रम सुराणा या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून साडेचौदा लाख रुपयांची रोकड हस्तगत केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन खरात यांनी सांगितले.
या कटातील यश नावाचा मुख्य आरोपी फरार आहे. उज्वल रामप्रसाद चांडक हे मूळचे मध्य प्रदेश रहिवासी असून तिथेच त्यांचा कमिशनवर कपडे खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. भुरामल जैन हे त्यांच्या परिचयाचे व्यापारी आहेत. १६ डिसेंबरला भुरामल यांनी उज्वल यांना फोन करून प्रसिद्ध कापड व्यापारी जितमल जैन हे आपले मित्र असून त्यांच्या मुलाचे काम असल्याचे सांगून त्यांना यश जैन त्यांचा मोबाईल क्रमांक दिला. यशने त्यांना तो एका बड्या उद्योगपतीचा मुलगा असल्याचे बतावणी करून त्यांचे वीस लाख रुपये इंदोर येथे असून त्याला मुंबईत पैशांची गरज असल्याने त्यांनी वीस लाख रुपये पाठवावेत असे सांगितले. त्यांना इंदोर येथे त्यांचे पैसे मिळतील असे सांगितले. काही वेळानंतर त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करून यशने त्यांना वीस लाख रुपये देण्यास सांगितले आहे ही रक्कम आपण घेऊन येत असल्याचे सांगून यशला तातडीने २) लाख रुपये पाठवून द्या अशी विनंती केली. उज्वल चांडक यांनी एका व्यापाऱ्याकडून २० लाख रुपयांची व्यवस्था करून यशने सांगितलेल्या ठिकाणी आंगडियाच्या मदतीने २० लाख रुपये पाठवले. काही वेळानंतर त्याने यशला फोन करून पैशांविषयी विचारणा केली होती. त्यावेळी यशने त्याला पैसे मिळाल्याचे सांगितले. त्याचा माणूस त्यांच्याकडे पैसे घेऊन येतो असे सांगून बराच वेळ वाट पाहून आला नव्हता. त्यामुळे त्यांनी यशला फोन केला. मात्र, त्याचा फोन बंद येत होता. त्यामुळे त्यांनी भुरामल जैन यांना फोन केला त्यांनी यशला फोन लागला नाही. त्यावेळी व्यापाऱ्याच्या मुलाचे नाव यश जैन नसल्याचे समोर आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
0 टिप्पण्या