मुंबई, दि. २१ : सीएसएमटी मधून सुटणाऱ्या मुंबई लोकल मधील गर्दीचा साक्षीदार असलेल्या कर्नाक पुलाचे आज सोमवार पासून मुंबईकरांना दर्शन होणार नाही. गेले ८१ दिवसांपासून सुरू असलेले काम पूर्णत्वास गेले असून इंग्रजांनी सन १८६८ मध्ये उभारलेला हा फुल रविवारी इतिहास जमा झाला.
सन २०१६ मध्ये हॅंकॉक पूल पाडताना वापरण्यात आलेल्या पद्धतीत अभिनव प्रयोग करून त्याचा वापर कर्नाक पूल पाडकामात करण्यात आला. ब्लॉकच्या काही दिवसांपूर्वी यावरील संपूर्ण काँक्रीट स्लॅब हटविण्यात आला होता. त्याचबरोबर गॅस कटरने सांगाड्याला हलके छेद देण्यात आले. यामुळे ब्लॉकच्या कालावधीत अवजड सांगाड्याचे तुकडे वेगाने बाजूला करणे शक्य झाले. तीन क्रेनचे नियोजन असताना अतिरिक्त ५०० टन वजनी क्षमतेच्या क्रेनमुळे अधिक अधिक तुकडे कमी वेळेत सुरक्षित स्थळे ठेवता आले. यामुळे हार्बर मार्ग नियोजित वेळेच्या दोन तास आधी प्रवासी वाहतुकीसाठी खुला झाला असे रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.






0 टिप्पण्या