Ticker

6/recent/ticker-posts

जे. जे. रुग्णालय परिसरात आढळले भुयार

मुंबई, दि. ७ : मुंबईतील जे. जे. रुग्णालय परिसरात असणाऱ्या डी.एम. पेटिट या साधारण १३० वर्षे जुन्या इमारतीमध्ये ब्रिटिशकालीन भुयार आढळले आहे. यामुळे पुरातन वास्तूंचा दर्जा असलेल्या काही अजून ऐतिहासिक संदर्भ देणाऱ्या वास्तू असू शकतील का याकडे साऱ्यांचे डोळे लागून राहिले आहेत. नर्सिंग कॉलेजचा भाग असलेल्या परिसरामध्ये निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिसलेल्या झाकणाकडे पोकळी होती. हे झाकण काढून त्याची पाहणी केली असता तिथे पुरातन भुयार असल्याचे दिसून आले. 




जय जय रुग्णालय परिसरात आढळलेल्या या भुयाऱ्याची लांबी २०० मीटर असून रुग्णालय प्रशासनाकडून पुरातत्व विभागांना या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. हे भुयार प्रसूती विभाग ते बालरोग विभागापर्यंत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. यापूर्वीही काही वर्षांपूर्वी सेंट जॉर्ज रुग्णालय परिसरातसह राजभवन येथेही भुयार सापडले होते. मुंबईतील काही किल्ल्यांमध्येही काही भुयारी आढळून आली होती या इमारतीच्या आयुर्मान लक्षात घेता ते १३० वर्षे जुने असल्याचे सांगण्यात आले १७७ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जे जे रुग्णालयाच्या इमारतीसाठी १६ मार्च १८३८ रोजी जमशेदजी जीजीभाई यांनी एक लाख रुपयांची देणगी दिली होती. त्यानंतर ३० मार्च १८४३ रोजी ग्रँड मेडिकल कॉलेज उभारणी झाली.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या