मुंबई, दि. १: धारावी सायन्स द्रुतगती मार्गावरील सायनच्या दिशेने जाणाऱ्या वाहिनीवर असलेल्या पिवळा बंगला परिसरात गॅरेजवर दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या पोलीस व्हॅनला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पोलीस व्हॅनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर पोलीस व्हॅन केंद्रीय पोलीस दलाची असल्याची माहिती समोर आली आहे.
एम एच ४३ एच ४७४३ नंबरची स्वराज माझदा कंपनीची पोलीस व्हॅन फॅब्रिकेशनच्या कामासाठी धारावी सायन द्रुतगती मार्गावरील मुंबई फायब्रिकेशन गॅरेजवर दुरुस्तीसाठी आली होती. वेल्डरने व्हॅनच्या समोरील भागात वेल्डिंग काम सुरू केले. वेल्डिंग सुरू असताना अचानक आगीचा भडका उडाला. तात्काळ वेल्डर तसेच त्याशेजारी उभे असलेले चालकाने प्रसंगावधान राखत स्वतःचा आगीपासून बचाव केला. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा जोरदार मारा करून आग नियंत्रणात आणली. तोपर्यंत व्हॅन आगीच्या भक्षस्थानी पडली होती.

0 टिप्पण्या