अल्पवयीन मुलाच्या मदतीने चोरी - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०२२

demo-image

अल्पवयीन मुलाच्या मदतीने चोरी

मुंबई, दि. १२: भायखळ्यातील एका व्यापाऱ्याच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा ४० लाखांचा ऐवज चोरीला गेला होता. व्यापाऱ्याच्या घरातच राहणाऱ्या व त्यांची नातेवाईक असलेल्या १३ वर्षांच्या मुलीला हाताशी धरून आरोपींकडून ही चोरी करण्यात आली होती. पण, भायखळा पोलीस ठाणे यांनी योग्यरीत्या तपास करून चोरीचा मामला उघडकीस आणला. या प्रकरणात सुरतमधील तीन जणांना पकडून चोरीचा ऐवज हस्तगत केला.

Hathkadi001


माझगाव येथील व्हिलेज व्हिला इमारतीत अब्दूलकादर गोघावाला हे व्यापारी राहतात. त्यांच्या घरात चोरीची घटना घडली होती. २६ सप्टेंबर रोजी गोघावाला यांच्या घरातील चार लाखांचे दागिने व १० लाखांची रोकड चोरीला गेली होती. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत घरातील ४० लाख १८ हजार किमतीचे दागिने व रोकड चोरीस गेली आहे. त्यामुळे त्यांनी तातडीने भायखळा पोलीस ठाणे गाठून चोरीची तक्रार दिली.


वरिष्ठ निरीक्षक अशोक खोत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय माने व पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी घरातील सदस्यांची चौकशी सुरू केली. तेव्हा गोघावाला यांची नातेवाईक असलेल्या व त्यांच्याकडे राहणाऱ्या मुलीची हालचाल पोलिसांना खटकली.


त्यामुळे तिला विश्वासात घेऊन पोलीस खाक्या दाखविल्यावर चोरीचा पर्दाफाश झाला. तक्रारदार यांची बहीण लग्नानंतर सुरतला सासरी गेली होती. त्यामुळे त्यांचा नातेवाईक व गुन्ह्यातील आरोपी आणि ती मुलगी एकमेकांना ओळखत होते. ती मुलगी गोघावाला यांच्याकडे किती पैसे व दागिने आहेत ते उत्सुकतेपोटी आरोपीला सांगायची. त्या नातेवाईकाने हाच धागा पकडून गोघावाला यांच्या घरात चोरी करायचे ठरवले. त्यानुसार त्याने अन्य दोघा मित्रांना हाताशी घेऊन आधी त्या मुलीला आपल्या जाळ्यात ओढले. मग तिला गरज असल्याचे भासवून वेगवेगळी कारणं व बतावणी करून तिला चोरी करण्यास सांगितले. त्यानुसार मुलीने संधी मिळेल तसे दागिने व पैसा घेऊन ते आरोपीला दिले. अशा प्रकारे आरोपींनी ४० लाख १८ हजारांचा ऐवज त्या मुलीच्या मदतीने चोरला.


हा प्रकार कळताच भायखळा पोलिसांनी ही चोरी उघडकीस आणून हुसेन पत्रावाला (१९), हुसेन बॉम्बेवाला (२२), अब्बास अत्तारी (२२) या तिघा आरोपींना सुरतमध्ये जाऊन बेड्या ठोकल्या. आरोपींकडून चोरीचा सर्व ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.






%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%96%E0%A4%B3%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8


Press note

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *