Ticker

6/recent/ticker-posts

दोन महिन्यांच्या चिमुकलीचे रस्त्यावरून अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे बाळ पुन्हा आईच्या कुशीत

मुंबई पोलिसांच्या अथक प्रत्यनाला यश, 
१२ तासांत आरोपीला अटक

मुंबई, दादासाहेब येंधे : मध्यरात्रीच्या वेळेस आझाद मैदान परिसरातील सेंट झेव्हीयर्स कॉलेज समोरील फुटपाथवर राहणाऱ्या कुटुंबातील एका २ महिन्यांच्या मुलीचे अपहरण झाले होते. 



या प्रकरणाची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी आठ पथके शोधमोहिमेसाठी रवाना केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या अनुषंगाने दोन आरोपींचा माग काढत त्यांना अटक केली. यासंदर्भात आयुक्त विवेक फणसाळकर यांनी पत्रकार काल परिषद घेऊन माहिती दिली व त्या चिमुरडीला पुन्हा तिच्या आईवडिलांच्या स्वाधीन केले.


मनीषा शेखर ही पती आणि तीन मुलांसह सेंट झेवियर्स शाळेसमोरील पदपथावर वास्तव्यास आहे. मंगळवारी रात्री मनीषा तीन महिन्यांच्या मुलीला कुशीत घेऊन नेहमीप्रमाणे फुटपाथवर झोपली होती. मध्यरात्री तिला जाग आली असता चिमुकली जवळ दिसली नाही. तिने पतीला उठवले आणि दोघांनी मिळून आजूबाजूला मुलीचा शोध घेतला. मात्र, ती कुठेच सापडली नाही. अखेर दोघांनी आझाद मैदान पोलीस गाठले आणि तक्रार दाखल केली. बुधवारी पहाटे गुन्हा दाखल होताच घटनेचे गांभीर लक्षात घेऊन अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनी दक्षिण मुंबई तेतील सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांची पथके तयार केली. गुन्हे शाखा आणि रेल्वे पोलिसांचीदेखील मदत घेण्यात आली. सीसीटीव्ही फुटेच्या मदतीने आरोपीचा माग घेतला जात असतानाच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर सीसीटीव्हीमध्ये आरोपी लहान मुलीला घेऊन जात असताना दिसले.


पोलिसांनी सीसीटीव्ही मध्ये मिळालेला फोटो आपल्या खबऱ्यांपर्यंत पोहोचवला. तर काही पथकांनी रेल्वे स्थानकाचे सीसीटीव्ही फुटेज करून आरोपीचा पाठलाग सुरू ठेवला. शोध कार्यादरम्यान आरोपी लहानगीला घेऊन वडाळा स्थानकात उतरून बाहेर पडल्याचे दिसले. सर्वच पथकांनी वडाळा आणि परिसरावर लक्ष केंद्रित केले सीसीटीव्ही मिळालेल्या चेहऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी हा परिसर पिंजून काढला. या दरम्यान फोटोतील आरोपीचे नाव हनीप असून तो शांतीनगर मध्ये राहत असल्याचे डोंगरी पोलिसांना समजले. डोंगरी पोलिसांच्या पथकाने शांतीनगर येथील घरात छापा टाकला. यावेळी आणि त्याची पत्नी आफरीन यांच्या ताब्यातून मुलीची सुखरूप सुटका करून घेतली.






 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या