चोरीप्रकरणी चालकाला अटक - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

बुधवार, १० ऑगस्ट, २०२२

चोरीप्रकरणी चालकाला अटक

मुंबई : कामगारांचे पगार देण्यासाठी मालकाने बँक खात्यातून लाखो रुपये काढले होते. मात्र, त्याच्या चालकाने पैसे घेऊन पोबारा केला. याप्रकरणी तक्रार दाखल होताच साकिनाका पोलिसांनी चालकाला अटक केली आहे. तुलसीदास योगेंद्र पटेल असे त्याचे नाव आहे. 



पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्रकाश राऊत (वय, ५१)  यांनी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी १५ लाख रुपये काढले होते. तसेच अतिरिक्त दोन लाख रुपये त्यांच्या कारमध्ये ठेवले होते. २ ऑगस्ट रोजी साकिनाका सिप्झ येथे नमो इंटरप्रायझेस कंपनीचे मालक राऊत हे जेबी नगर येथे बैठकीसाठी गेले होते. त्यांनी त्यांच्या कारच्या मागील सीटवर १५ लाख रुपये ठेवले होते. बैठकीनंतर त्यांच्या चालकाला पत्नीला घेण्यासाठी पाठवण्यात आले. मात्र, संध्याकाळी ५ वाजता राऊत घरी पोहोचले, त्यावेळी त्यांना गाडीत रोकड सोडल्याचे लक्षात आले. 


राऊत यांनी पटेल यास रोख रक्कम त्यांच्या घरी आणण्यास सांगितले. मात्र, पटेल आलाच नाही. तसेच त्याने मोबाईल फोनही बंद करून ठेवला. त्यामुळे संशय आल्याने त्यांनी इमारतीच्या पार्किंग परिसरात जाऊन कार तपासली. त्यावेळी कारमध्ये त्यांना रोकड सापडली नाही. त्यावर सदर रक्कम ड्रायव्हर पटेल घेऊन पळून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी साकिनाका पोलिसांत तक्रार दाखल करताच पटेल याला पोलिसांनी अटक केली. 









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज