Ticker

6/recent/ticker-posts

प्रेयसीला लग्न करून हक्काच्या घरात न्यायचे होते...

'डी' कंपनीच्या नावाने धमकी
प्रेयसीला  घराऐवजी जावे लागले तुरुंगात


मुंबई : प्रेयसीसोबत लग्न करून तिला हक्काच्या घरात न्यायचे होते. घर घेण्यासाठी झटपट पैसा पाहिजे म्हणून त्यासाठी त्यानं नोकरी सोडून मालकाला टार्गेट केले. परराज्यातील सिमकार्ड वरून मालकाला कॉल केले आणि 'डी' कंपनीच्या नावाने धमकावत ३५ लाखांची मागणी केली. पण, झटपट पैशासाठी निवडलेला हाच मार्ग त्याला तुरुंगात घेऊन गेला.


सादिक अमिनुल्ला (वय,२५) असे त्या तरुणाचे नाव असून अंधेरी पश्चिमेकडील दिनकर (नाव बदललेले) यांची बेकरी आहे. ९ तारखेला दिनकर यांस आसाम राज्यातील सिमकार्ड वरून फोन आला आणि मी छोटा शकीलचा पंटर बिल्लो बोलतोय, मंगळवारपर्यंत ३५ लाख दिले नाही तर गोळी झाडून ठार करू असे त्यांनी धमकी दिली. दिनकर यांनी पोलिसांत तक्रार दिली. मात्र, तरीदेखील त्यानंतर १३ ते १९ तारखेपर्यंत दिनकर यांना सारखे धमकीचे फोन यायचे. त्यामुळे खंडणीविरोधी पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे, निरीक्षक अरुण थोरात, एपीआय मारुती कदम व पथकाने तांत्रिक बाबींचा अभ्यास करून आरोपींचा शोध सुरू केला. पण, दिनकर यांना धमकीचे येणारे फोन परराज्यातील नंबर वरून येत असल्याने आरोपींचा शोध घेणे कठीण होत होते.


सादिकने ओशिवरा येथील एका चहावाल्याच्या मोबाईलवरून दिनकर यांना पैशासाठी धमकावले होते. त्याच नंबरवरून पोलीस त्या चहावाल्यापर्यंत धडकले. पण, चहावाल्याला आपण ज्याला फोन करायला मोबाईल दिला होता त्याचे नाव माहीत नव्हते. पथकाने चहावाल्याजवळच फिल्डिंग लावली. दोन दिवसानंतर सादिक त्या चहावाल्याकडे फोन करायला येताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. सादिक हा पूर्वी दिनकर यांच्या बेकरीत कामाला होता.








Press Note

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या