मुंबई : व्हेल माशाची उलटी विकण्याचा तयारीत असलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले. वैभव कालेकर (वय २५ वर्षे) अटक केलेल्या तरुणाचे नाव असून त्यांच्याकडील ६१६ किलो वजनाची उलटी हस्तगत केली आहे.
मरीन ड्राइव्ह परिसरात एक तरुण व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती प्रोपर्टी सेलला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. दापोली येथे राहणारा वैभव कालेकर याला ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे दोन कोटी ६० लाख किमतीची व्हेल माशाची उलटी सापडली. याप्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील कारवाईसाठी वैभवला मरीन ड्राईव्ह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Press Note

0 टिप्पण्या