चार जिवंत काडतूस हस्तगत
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा कक्ष 0२ पनवेल यांच्या कडून पनवेल रेल्वे स्टेशन, नवी मुंबई येथे बेकायदेशिररित्या अग्नीशस्त्रांची विकी करण्यास आलेल्या गुन्हेगारास अटक करण्यात आलेली आहे. सदर अटक आरोपी कडुन ३,४७,१००/- रूपये किंमतीचे एकुण 0४ अग्नीशस्त्र व चार जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहेत.
नवी
मुंबई पोलीस आयुक्तालया मध्ये बेकायदेशिररित्या अग्नीशस्त्रांची विकी करण्यासाठी येणारे
गुन्हेगारांवर कारवाई
करण्याबाबत मा. पोलीस आयुक्त
श्री. बिपीन कुमार सिंह सो, नवी
मुंबई, मा. सह पोलीस आयुक्त
श्री. डॉ. जय जाधव
सो, मा. अपर पोलीस
आयुक्त, गुन्हे, श्री.
महेश घुर्ये सो, मा.पोलीस
उप आयुक्त, गुन्हे शाखा, श्री सुरेश मेंगडे
सो, मा. सहा. पोलीस
आयुक्त गुन्हे शाखा, श्री विनायक वस्त
सो, यांनी वेळोवेळी आढावा घेवून विशेष मोहिम राबवुन बेकायदेशिररित्या अग्नीशस्त्रांची विकी करण्यासाठी येणारे
गुन्हेगारांच्या मुसक्या
आवळुन वेळीच प्रतिबंध करण्याबाबत आदेश दिले होते.
त्याअनुषंगाने
एक इसम पनवेल रेल्वे
स्टेशन परीसरात बेकायदेशिररित्या अग्नीशस्त्रांची विकी करण्यासाठी येणार असल्याबाबत गोपनिय बातमीदाराकडुन गुन्हे शाखा, कक्ष 0२ यांना माहिती
प्राप्त झाली होती. सदर माहितीचे अनुषंगाने
पडताळणी करून कारवाई करण्याबाबत
वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार गुन्हेशाखा कक्ष २, पनवेल
चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांचे मार्गदर्शनाखाली
पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे दोन पथक तयार
करून पनवेल रेल्वे स्टेशन परीसरात सापळा रचुन गोपाल राजपाल
भारव्दान, वय २२ वर्षे,
व्य. बेकार, रा. नवोदय नगर,
टेहरी विस्थापीत कॉलनी, साई मंदिर पार्कच्या
जवळ, हरीव्दार, उत्तराखंड मुळ रा. ५३५८
नेहरू नगर, सहारनपुर, राज्य
उत्तरप्रदेश यांस पळून जाण्याच्या
तयारीत असताना शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर अटक आरोपीतांकडे असलेल्या
बॅग(सॅक)ची तपासणी
केली असता त्यामध्ये देशी बनावटीचे 0४
अग्निशस्त्रे व 0४ जिवंत
काडतुसे मिळून आली आहेत. सदर
आरोपीताविरुध्द पनवेल शहर पोलीस ठाणे
गुन्हा रजिस्टर कमांक २९४/२०२२ भारतीय
हत्यार कायदा कलम ३, २५
अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला
आहे. सदर गुन्हयाचा पुढिल
तपास गुन्हे शाखा कक्ष २,
पनवेल हे करीत आहेत.
अटक आरोपी - गोपाल राजपाल भारव्दाज, वय २२ वर्षे, व्य. बेकार, रा. नवोदय नगर, टेहरी विस्थापीत कॉलनी, साई मंदिर पार्कच्या जवळ, हरीव्दार, उत्तराखंड मुळ रा. ५३५८ नेहरू नगर, सहारनपुर, राज्य उत्तरप्रदेश.
सदरच्या गुन्हयाच्या तपासादरम्यान सपोनि संदिप गायकवाड, सपोनि. फडतरे, पोउपनि. पाटील, पोउनि वैभव रोंगे, पोहवा १७३२ अनिल पाटील, पोहवा १०३४ ज्ञानेश्वर वाघ, पोहवा/१३३९ प्रशांत काटकर, पोहवा/१३४३ मधुकर गडगे, पोहवा/४२० सचिन पवार, पोहवा/१९३ रणजित पाटील, पोहवा/४४ तुकाराम सुर्यवंशी, पोहवा/१९३० राजेश बैकर, पोना /१७९९ निलेश पाटील, पोना/१७३८ दिपक डोंगरे, पोना २००५ सचिन म्हात्रे, पोना २०२२ ख्पेश पाटील, पोना/२०८२ इंद्रजित कानु, पोना/२२५६ राहुल पवार, पोना/२३३४ प्रफुल्ल मोरे, पोशि/१२५५९३ संजय पाटील, पोशि/ ३५७७ प्रविण भोपी, पोशि ४३१७ विक्रांत माळी यांनी सदर उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
*आपल्या बातम्या dyendhe1979@gmail.com या इमेलवर press note व फोटोसहित इमेल कराव्यात
प्रेस नोट

0 टिप्पण्या