संबंधित तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार किमान कालावधी ९ महिन्यांवरुन ९० दिवसांवर
भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे निर्देश
कोविड प्रतिबंधाधित संगणकीय प्रणालीत आवश्यक ते बदल केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या स्तरावर करण्यात आले असल्याचेही सदर पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. त्याचबरोबर लशीची मात्रा देण्याबाबतच्या सर्व मार्गदर्शक सुचनांनुसार व वैद्यकीय उपचार क्रमानुसार आवश्यक त्या बाबींची अंमलबजावणी सुयोग्यप्रकारे करणे आवश्यक आहे. तरी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व सार्वजनिक व खासगी लसीकरण केंद्रांनी याची नोंद घ्यावी व त्यानुसार योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात येत आहेत.
आरोग्य कर्मचारी, आघाडीवर काम करणारे कर्मचारी व वय वर्षै ६० पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना सदर सुविधा शासकीय व महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर मिळेल. तसेच १८ वर्षे ते ५९ वर्षे वयोगटातील नागरिकांना खाजगी लसीकरण केंद्रावर सदर सुविधा उपलब्ध असेल. यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पात्र नागरिकांनी प्रतिबंधात्मक मात्रा वेळच्यावेळी घेण्याचे आवाहनही महानगरपालिका प्रशासनाद्वारे यानिमित्ताने पुन्हा एकदा करण्यात येत आहे.
जसंवि/०७९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा