Ticker

6/recent/ticker-posts

मुंबई पोलिसांना मिळणार प्रवासभत्ता

आयुक्तांचा हिरवा कंदिल

मुंबई : राज्यातील इतर पोलिसांप्रमाणे मुंबई पोलिसांनाही प्रवास भत्ता देण्याच्या मागणीला पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी हिरवा कंदील दिला, तसेच जून महिन्यापासून प्रवासभत्ता पगारात देण्याचा आदेश जारी केला आहे.


मुंबईत फक्त मुख्यालयाशी संलग्न असलेल्या पोलिसांनाच प्रवास भत्ता मिळत होता. मात्र तोदेखील वेळेत मिळत नसल्यामुळे त्याकडेही आयुक्तांनी लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे. पोलिसांना बेस्ट प्रवास मोफत असल्यामुळे त्यांना प्रवास भत्ता देण्यात येत नव्हता. मात्र, बरेच पोलीस अधिकारी व कर्मचारी हे खासगी वाहन किंवा रेल्वेने प्रवास करत असल्यामुळे त्यांनी अन्य राज्यांप्रमाणे पगारात प्रवास भत्ता देण्याची मागणी केली. 


त्यानुसार, आयुक्तांनी आढावा घेऊन केवळ एक तृतीयांश पोलिसांची बिले बेस्ट कडून येत असल्याचे दिसून आले. त्यानुसार, संबंधित रक्कम पोलिसांकडून बेस्ट विभागाला देण्यात येते. त्यानुसार पोलिसांच्या मागणीचा विचार करत आयुक्तांनी मुंबई पोलिसांना प्रवास भत्ता लागू करण्याचा आदेश जारी केला. जून महिन्यापासून प्रवास भत्ता लागू केल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.







Viral letter

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या