Ticker

6/recent/ticker-posts

कर्तव्याला सलाम...!

 ठाणे रेल्वे स्थानकात काळजाचा ठोका चुकवणारी घटना

-दादासाहेब येंधे

मुंबई, दि.१२ : मुंबई उपनगरी रेल्वेला जीवनवाहिनी म्हटले जाते. या रेल्वेतून लाखो लोक रोज पोटापाण्यासाठी प्रवास करीत असतात. कधीकधी रेल्वेचे आणि आपले वेळापत्रक चुकल्यामुळे काहीजण आपला जीव धोक्यात घालून लोकल पकडण्याचा प्रयत्न करत असतात. 


असाच एक प्रसंग ठाणे लोकल स्थानकावर आज (दि. १२ मे २०२२ रोजी) घडला. मात्र, नांदेडला जाणाऱ्या त्या प्रवासासाठी पोलीस अंमलदार तुषार सोनताटे हे देवदूत ठरले.


सकाळी ०७:४८ ची घटना... प्रत्येकजण लोकल, एक्सप्रेस, मेल पकडण्याचा शर्यतीत धावत होते. फलाट क्रमांक ४ वर जाण्यासाठी एक प्रवासी आपला जीव धोक्यात घालून पटरी क्रॉस करत होता... समोरून येणारी लोकल त्याने पाहिले नाही... धावतच तो  प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर चढत होता... उजव्या बाजूने भरधाव वेगात लोकल जवळ येत होती... आणि आता फक्त एक सेकंद... त्या प्रवाशाने प्लॅटफॉर्मवर चढण्यासाठी उडी मारली... काळजाचा ठोका चुकवणारी घटना...

व्हिडीओ 👇पहा...


तो लोकलखाली अडकून चिरडला जाणार इतक्यात तेथे कर्तव्य बजावत असलेली पोलीस अंमलदार तुषार सोनताटे (बक्कल क्र.०१५/२०१८) यांच्या लक्षात ही घटना येताच त्यांनी तत्परतेने त्याच्याकडे धावत आपल्या हातातील काठी बाजूला फेकून देत त्या प्रवाशाला हात देऊन वर घेतले आणि त्याचा जीव वाचवला. अशी माहिती ठाणे लोहमार्ग पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी दिली आहे.



खरंच... एका पोलीसाच्या रूपात जणू देवच धावून आला. सलाम सोनताटे यांच्या धाडसाला आणि कर्तव्याला...!






*आपल्या बातम्या प्रसिद्धीकरिता dyendhe1979@gmail.com या इमेलवर प्रेसनोट, फोटोसहित इमेल कराव्यात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या