मा.पालीस आयुक्त, बृहन्मुंबई मुंबई यांनी मुंबई शहरात वाढत असलेल्या अंमलीपदार्थ विक्री करणारे व व्यसनार्थी यांना आळा घालण्यासाठी पोलीस ठाणे स्तरावर विशेष पथकाची नियुक्ती करून अंमलीपदार्थ विक्री करणारे आरोपीत इसम यांचा शोध घेवुन अशा प्रकारचे गुन्हयांना आळ्या घालण्यासाठी व समुळ नष्ट करणेसाठी विशेष मोहीम सुरू करण्याचे आदेशित केले.
त्याप्रमाणे मा. पोलीस उप आयुक्त, परिमडळ ११, मुंबई व मा. सहायूक पोलीस आयुक्त, मालवणी विभाग, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली व व,पो.नि. शेखर भालेराव, मालवणी पोलीस ठाणे, मुंबई यांच्या थेट देखरेखीखाली गुन्हे प्रकटीकरण पथक, निगराणी पथक व एटीसी पथक यांची स्वतंत्र पथके तयार करून त्यांना याबाबत कारवाई करण्यास आदेशित केले आहे. त्याप्रमाणे दिनांक २०/०४/ २२ रोजी गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि हसन मुलाणी व पथक यांनी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीदायक माहिती आधारे संशयित इसम नामे विक्टर नावाचा इसम वय ३२-३८ वर्षाचा इसम. हा अंमलीपदार्थ मेफेड्रॉन (एम.डी.) ड्रग्ज विक्री करण्याकरीता मालवणी पोलीस ठाणे हद्दीत म्हाडा मैदानाच्या बाजुस, लगुन रोड, कच्या रस्ता, मालवणी, मालाड वेस्ट, मुंबई येथे येणार असल्याचे समजले. त्याप्रमाणे दोन पथके तयार करून टिपू सुलतान मैदानाजवळ जावून सापळा रचण्यात आला. सदर ठिकाणी खबरीच्या वर्णनातील एक इसम येवून थांबला असता सदर ठिकाणी तो कोणाची वाट पाहत असल्याचे आढळून आले.
नमुद इसमाच्या हालचाली संशयास्पद दिसल्याने व तो तेथुन निघण्याच्या तयारीत असताना सपोनि मुलाणी व पथकाने त्यास घेराव घालून ताब्यात घेतले. नमुद सदर ठिकाणी थांबण्याचे कारण विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यास ताब्यात घेवून नमुद इसमाची दोन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचेकडे ०५ पिशव्या मिळुन आल्या. त्याबाबत त्यास विचारले असता मेफेड्रोन अंमलीपदार्थ असल्याचे सांगितले. नमुद ०५ 'पिशव्यातील अंमलपदार्थाचे वजन केले असता एकूण ७५० ग्रॅम वजनाचे मिळुन आले असून अंमलीपदार्थाची एकूण किमंत १,१२,५०,०००/-_ आहे. नमुद इसमांस त्याचे पुर्ण नाव विचारले असता त्याने त्याचे नाव व्हिक्टर ऑग्बॉना उर्फ नेनेयू (नायजेरीयन) असल्याचे सांगितले. अशा प्रकारे अंमलीपदार्थ विक्री करण्यास परवानगी नसताना देखिल अंमलीपदार्च विक्री करण्यासाठी स्वत:जवळ बाळगले म्हणून नमुद इसमांविरूध्द मालवणी पोलीस ठाणेस वि.स्था.गु.नॉद क्र९५६/ २२ कलम ८(क)सह २२ एनडीपीएस अँक्ट १९८५ अन्वये गुन्हा नोंद करून नमूद इसमांस गुन्हयात अटक करण्यात आली.
सदरची कारवाई मा.प्रविणकुमार पडवळ अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, मुंबई, मा. विशाल ठाकुर, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ११, मुंबई, मा शेलेंद्र धिवार, सहा. पोलीस आयुक्त, मालवणी विभाग, मुंबई व मा. शेखर भालेराव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,मालवणी पोलीस ठाणे, महेद्र सुर्यवशी, पोलीस निरीक्षक ऐन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक हसन मुलाणी, सपोनि चव्हाण व गुन्हे प्रकटीकरण पथकातील : स.फौ. मोरे व पो.ह.३९३४९/शिंदे, पो.शि.०६०४०१/ भंडारे,पो.शि,०८ १६६ २.०९०१९६/वत्रे,पो.शि.९९,०९५०-खांडवी,पोशि.९३०७४१/ आमटे.यांनी केली.
Press note

0 टिप्पण्या