१३ पिस्तुलासह ३६ काडतुसे जप्त
मुंबई, दादासाहेब येंधे : डोंबिवली कल्याण मधून शस्त्रांची खरेदी-विक्री करणारे ११ जणांना राज्य दहशतवादविरोधी पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून १३ पिस्तुलासह ३६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
एटीएसने दिलेल्या माहितीनुसार ३१ जानेवारीला काळाचौकी युनिटने शस्त्रांची विक्री करणाऱ्या एका आरोपीला मुलुंड परिसरातून अटक केली. या प्रकरणीत्याच्या विरोधात काळाचौकी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. आरोपीच्या चौकशीतून अन्य आरोपींची माहिती मिळताच पथकाने मुलुंड, कांदिवली, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि उरण परिसरात एटीएसच्या पथकाने छापेमारी केली. यादरम्यान ११ जणांना अटक केली. त्यांच्याकडून १३ फॅक्टरी मेड पिस्तूल आणि ३६ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
आरोपींनी हा शस्त्रसाठा कशासाठी आणला होता? ते कुठल्या कटाच्या तयारीत होते का? आरोपींनी या पिस्तुलांचा कोणत्या गुन्ह्यात वापर केला होता का? याबाबत आरोपींकडे कसून चौकशी सुरू आहे. तसेच त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.
Press Note
0 टिप्पण्या