मुंबई : राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार व केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार यांच्यातील संघर्षाच्या नव्या प्रकरणास काल बुधवारी प्रारंभ झाला. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम संबंधित कुर्ला येथील एलबीएस मार्गावरील गोवावाला कंपाऊंडमधील एका मालमत्तेच्या खरेदी व्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांना चौकशीनंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली. त्यानंतर त्यांना आठ दिवसांची ईडी कोठडी सुनावली.
कोठडी सुनावल्यानंतर मलिक यांनी 'कुछ देर की खामोशी है, फिर शोर आयेगा', 'तुम्हारा तो सिर्फ वक्त है, हमारा दौर आयेगा', असे ट्विट करत लढाई सुरू राहणार असल्याची प्रतिक्रिया नोंदवली.
0 टिप्पण्या