Ticker

6/recent/ticker-posts

एका युगाचा अंत

 गानसम्राज्ञी गेली...

मुंबई : 'थांबला असला श्वास दरी दूर, राहिले सदा सोबतीला...' जो सूर ऐकत देशाच्या अनेक पिढ्यांना गाणं म्हणजे काय हे कळलं. संगीत विश्वातील मातब्बर मंडळी त्या सुरांना 'ईश्वराचं देण' मानत वंदन करतात. अशा भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लतादीदिंना कोरोनाची लागण झाली होती. तसेच त्यांचा कोरोना चाचणी अहवाल देखील पॉझिटिव आला होता. त्यातून त्या बऱ्यादेखील झाल्या होत्या. पण, न्यूमोनियाची लागण झालेली असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर त्यांची प्राणज्योत आज मालवली.



जवळजवळ सहा दशकांच्या प्रदीर्घ आणि दैदिप्यमान कारकिर्दीत दीदींनी जितक्या संगीतप्रेमींना मग तो सर्वसामान्य श्रोता असो किंवा दर्दी ज्या प्रमाणात आनंद दिला आहे. तो आनंद देशाच्या पॉप्युलर कल्चरच्या इतर कुठल्याही कलाकाराने आजवर दिलेला  नाही.


हृदय आणि मन यापासून देवाने आवाज सारख्याच अंतरावर ठेवला आहे असं म्हणतात. कोणतीही महान गायकी ही भावना आणि तंत्र या घटकांचा समन्वय असते. लतादीदींच्या आवाजात या दोन्ही घटकांच्या अप्रतिम संगम झाला होता  लतादीदींची प्रतिभा बऱ्याच प्रमाणात निसर्गदत्त असली तरी त्यात उत्कट संगीत साधना आणि कुशाग्र बुद्धिमत्ता यांचा खूप मोठा सहभाग होता. जोवर भारतीयांच्या मनात धर्मप्रेम व देशप्रेम जागे आहे, तोवर सर्व जनतेला गणेशोत्सवात, स्वातंत्र्य व प्रजासत्ताक दिनी लतादीदींची गाणी ऐकू येत राहतील. लता मंगेशकर यांचे निधन हे देशाचे मोठे नुकसान आहे. त्यांचे अनेक संगीत पिढ्यांना स्मरणात राहील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या