मुंबई : वांद्रे परिसरातून बेपत्ता झालेल्या ४ वर्षाच्या मुलीचा शोध घेण्यास खेरवाडी पोलीस ठाण्याच्या निर्भया पथकाला यश आले आहे.
संत ज्ञानेश्वर नगर वांद्रे येथे चार वर्षांची मुलगी हरवल्याची माहिती खेरवाडी पोलीस ठाणेस मिळताच निर्भया पथक तेथे पोहोचले. पथकाने मुलीस ताब्यात घेतले. मुलगी काहीच बोलत नसल्याने पथकाने तिच्या पालकांचा शोध लावला. तिला पालकांच्या स्वाधीन केल्यावर पालकांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. अशी माहिती मुंबई पोलिसांनी ट्वीट करून दिली आहे.
0 टिप्पण्या