Ticker

6/recent/ticker-posts

पोलिसांच्या गणवेशात फिरणाऱ्या तोतया वाहतूक पोलिसाला बेड्या

सायनमध्ये बोगस वाहतूक पोलसाला अटक

मुंबई, दादासाहेब येंधे : वाहतूक पोलिसांचा गणवेश घालून माटुंगा वाहतूक चौकी परिसरात फिरणाऱ्या एका बोगस भामट्याला वाहतूक पोलिसांनी पकडले आहे. टॅक्सी चालकांशी संशयास्पदरित्या बोलताना दिसल्याने तो पकडला गेला. शिव (सायन) पोलिसांनी त्याला अटक केली असून कोर्टाने त्याला ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 



माटुंगा वाहतूक विभागात कार्यरत असलेले अंमलदार संदीप शेलार आणि सचिन घागरे हे गस्त घालत असताना त्यांना एक तरुण वाहतूक पोलिसांचा गणवेश परिधान केलेला व टॅक्सी चालकांची बोलताना दिसून आला. त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने शेलार व घागरे यांनी त्याच्याजवळ जाऊन विचारपूस केली असता त्याला विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे त्यास देता आली नाहीत.


तसेच त्याच्याकडे ओळखपत्र देखील नव्हते. महाराष्ट्र सुरक्षा बलाचे ओळख पत्र सापडले; पण तेही दुसऱ्याचे होते. त्यामुळे त्याला चौकीत नेऊन चौकशी केल्यावर त्याचे पितळ उघडे पडले. सूर्यकांत माने (वय ४५) असे त्याचे नाव असून त्याने पोलीस नसल्याचे कबूल केले आहे. त्याला पकडून अधिक कारवाईकरिता शीव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले पोलीस बनून सूर्यकांत याने काही गैरप्रकार केला आहे का याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या