गुन्हे शाखा-५ कडून अटक
-दादासाहेब येंधे
ठाणे पोलीस आयुक्तालयात गुन्हे शाखा- ७ नेमणुकीतील स.पो.निरी/ भुषण शिंदे यांना वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या हददीमध्ये उत्सव हॉटेलसमोर, विवियाना मॉल जवळ एक व्यक्ती शुभम देविदास शिंदे (२६ वर्षे) रा. टिटवाळा, जि. ठाणे हा दुर्मिळ प्रजातीचे संरक्षित वन्यजीव सांबर आणि चितळ यांची शिंगे विक्री करण्याकरीता येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांचेसह गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी सापळा रचुन आरोपी शुभम देविदास शिंदे यास दिनांक ०२/०२/२०२२ रोजी ताब्यात घेतले.
चौकशीत त्याच्याकडून सुमारे १७ लाख रुपये किंमतीची ८ किलो ग्रॅम वजनाची सांबर आणि चितळ यांची १० नग शिंगे जप्त करण्यात आली आहेत. वर्तकनगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ४६/२०२२ भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९, ३९, ४४, ४८, ४८(अ), ५१ अन्वये सदर गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदरची शिंगे सांबर आणि चितळ यांची कुठे शिकार करून मिळविली व ती कोणास विक्री करणार होते याबाबत पुढील तपास वर्तकनगर पोलीस स्टेशन कडुन करण्यात येत आहे.
सदरची कारवाई मा. वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वागळे शाखा-७, ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विकास घोडके, पोलीस निरीक्षक श्री. अरूण क्षिरसागर, सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री. भुषण शिंदे, पोउपनिरि. श्री. शिवाजी कानडे, स.फौ. सालदुर, सुनिल अहिरे, पो.हवा. संदिप शिंदे, रोहिदास रावते, पो.ना. रघुनाथ गार्डे, सुनिल निकम, राहुल पवार, तेजस ठाणेकर, उत्तम शेळके, चालक पो.कॉ. यश यादव या पथकाने केली आहे.
Press Note
0 टिप्पण्या