Ticker

6/recent/ticker-posts

अखेर त्या बाळाचे नामकरण झाले....

मुंबई : कोविडच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार नियंत्रणात आल्यानंतर १ नोव्हेंबरपासून राणीबागेचे दरवाजे पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. त्यावेळेस करिश्मा वाघीण गर्भवती असल्यामुळे तिची विशेष काळजी घेण्यात येत होती. अखेर ९० दिवसांनंतर या वाघिणीने १४ नोव्हेंबर २०२१ रोजी एका मादी बछड्याला जन्म दिला. सध्या करिश्मा व तिच्या बछड्याला पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. 

मादी असलेल्या या बछड्याचे नामकरण काल राणीबागेत महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्याहस्ते केक कापून करण्यात आले. वीरा असे करण्यात या मादी बछड्याचे नामकरण करण्यात आले आहे. 

वीराच्या निमित्ताने भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात तब्ब्ल १५ वर्षानंतर वाघाचा जन्म झाला आहे. 




वीरा 








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या