मुंबई : २०२०२ साली ज्या विद्यार्थ्यांनी नर्सरीत प्रवेश घेतला होता त्यांच्यासाठी शाळा म्हणजे लॅपटॉप किंवा मोबाईलची स्क्रीन होती.
त्यामुळे या विद्यार्थ्यांना मागील दोन वर्षात शाळेत जाता आले नाही. मात्र, यंदा पहिल्यांदाच या विद्यार्थ्यांची शाळा सुरू झाली. शाळा कशी दिसते, शाळेत काय असतं यावर्षी कुतूहल मनात ठेवत खाऊचा डबा, वॉटर बॅग घेऊन नर्सरी, केजी, बालवाड्यांमध्ये चिमुकल्यांनी सोमवारी पहिल्यांदाच प्रत्यक्ष शाळेत हजेरी लावली.
मुंबई महापालिकेने पहिली ते बारावी बरोबरच केजीचे वर्गदेखील सुरू करण्यासाठी परवानगी दिल्याने तब्बल दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच पूर्वप्राथमिक वर्गात शिकणारे विद्यार्थी शाळेत दाखल झाले. शाळांनी या विद्यार्थ्यांचे सुरेल स्वागत केले.
0 टिप्पण्या