Ticker

6/recent/ticker-posts

रोख रक्कम चोरी करणाऱ्या आरोपीस तात्काळ अटक

  सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांची जबरदस्त कारवाई

मुंबई, दादासाहेब येंधे : बिमलकुमार दयारामकुमार त्रिपाठी हे माजी सैनिक दिनांक २० जानेवारी २०२२ रोजी मुंबईत कामाच्या शोधाकरीता आले होते. दिवसभर कामाचा शोध घेवून थकल्याने ते सीएसएमटी रेल्वे स्टेशनवरील रिझर्वेशन हॉल समोरील ओटयावर बसले. तसेच त्यांच्याजवळ असलेली कागदपत्रे व २,१२०/- रू. असलेली साईड शोल्डर कापडी पिशवी त्यांनी बाजूला ठेवली व बसल्या जागीच त्यांना झोप लागली. दिनांक २१/०१/२०२२ रोजी ०२.०० वा. चे सुमारास त्यांना झोपेतून जाग आली असता त्यांनी त्यांच्याजवळील पिशवीतील रोख रक्कम पाहिली असता ती कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांच्या झोपेचा फायदा घेवून चोरी केली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. 



त्यांनी तात्काळ सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाणेत तक्रार दाखल केली. सदर बाब गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोहवा/९३२ मानेरसुरू, पोशि/५७४ निकाळे, पोशि/१०७२ जाधव, पोशि/५७६ भारूड यांना माहिती पडताच त्यांनी लागलीच आरोपीचा शोध घेण्यास सुरवात केली असता त्यांना सीएसएमटी रेल्वे स्थानक परिसरात एक इसम संशयीत फिरत असताना दिसून आल्याने त्यास ताब्यात घेवून पोलीस ठाणेत घेवून आले. त्या व्यक्तीस त्याचे नाव व पत्ता विचारणा केली असता त्याने त्याचे नांव सेल्वा राजू डिसूजा, वय २३ वर्षे, व्यवसाय - मजुरी, राहणार कुमठा स्ट्रीट गल्ली, कमानी चेंबरच्या खालची गल्ली, विन्सर हॉटेलच्या समोरील झोपडपट्टी, बेलार्ड पिअर, फोर्ट, मुंबई असे सांगितले.


सदर इसमाची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीमध्ये तक्रारदार यांची चोरी केलेली रक्कम मिळून आल्याने आरोपीस अटक करण्यात आली. सदर आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत आरोपी असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अंमलदार यांच्या कार्यतत्परतेमुळे अभिलेखावरील सराईत आरोपीस अटक करण्यात यश मिळाले आहे. सदर कामगिरीबाबत मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मेहबूब इनामदार यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अंमलदारांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला.
















Press note

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या