Ticker

6/recent/ticker-posts

महिला पोलीस अंमलदारांना आठ तास ड्युटी द्या

 परिपत्रक जारी, पोलीस कुटुंबियांमध्ये आनंद

मुंबई, दादासाहेब येंधे : महिला पोलीस आमदारांना बारा तास ड्यूटी असल्याने त्याचा परिणाम कौटुंबिक जबाबदारीवर होतो याचा विचार करून आता राज्यातील महिला पोलीस अमलदारांसाठी आठ तासांची ड्युटी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


महाराष्ट्र पोलीस दलाचे महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे गुरुवारी परिपत्रक जारी केले आहे. काही दिवसांपूर्वी पुणे शहरात प्रायोगिक तत्त्वावर महिला मतदारांना ८ तासाचे कर्तव्य करण्यात आले होते. हा प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व जिल्हा पोलिस दलात त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. महिला अंमलदार यांचे किमान चार तास कर्तव्याचे कमी होणार असून महिलांसाठी हा सुखद क्षण असणार आहे.



पोलीस दलात मोठ्या संख्येने महिला कर्तव्य बजावत आहेत. त्या महिलांना कर्तव्यासोबतच कौटुंबिक जबाबदारीही पार पाडावी लागत आहे. परिणामी, सण-उत्सवातील अतिरिक्त बंदोबस्तामुळे तसेच बारा तासांच्या ड्युटीमुळे त्यांना घराकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. महिला अंमलदारांना कर्तव्यात सोबत कौटुंबिक जबाबदारीचा ताळमेळ बसण्यासाठी वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे याकरता कर्तव्य तास निश्चित करणे महत्त्वाचे होते सदर बाब लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.




















Press Note

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या