मुंबई : सन १९७१ च्या युद्धातील विजयाच्या सुवर्ण महोत्सव गुरुवारी कुलाबा लष्करी तळावर साजरा करण्यात आला. यानिमित्ताने भूदलाने तसेच माजी सैनिकांनी शहीद स्तंभाला आदरांजली वाहिली.
१९७१ च्या युद्धात पाकिस्तानने १६ डिसेंबर रोजी सपशेल शरणागती पत्करली होती. त्यानिमित्ताने हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा होतो. यंदा या विजयला ५० वर्षे पूर्ण होत असल्याने त्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या