डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी विधानभवन येथे अभिवादन - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

मंगळवार, ७ डिसेंबर, २०२१

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी विधानभवन येथे अभिवादन

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वाहिली आदरांजली

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काल विधानभवनाच्या प्रांगणात असलेल्या त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यासंदर्भात विशेष उपक्रम राबविणाऱ्या वाचनालयांना उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी १० लक्ष रुपयांचा निधी जाहीर केला. यासंदर्भात उपसभापती कार्यालय येथे संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी विधानमंडळाचे उप सचिव विलास आठवले, राजेश तारवी, उप सभापती, विधानपरिषद यांचे खाजगी सचिव तथा जनसंपर्क अधिकारी रविंद्र खेबुडकर, सचिन चिखलकर आदिंसह अन्य अधिकारी व कर्मचारी वर्गानेही गुलाबपुष्प अर्पण करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. 















dgipr

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज