दत्तजयंती उत्सव उत्साहात साजरा - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शनिवार, १८ डिसेंबर, २०२१

दत्तजयंती उत्सव उत्साहात साजरा

मुंबई, दादासाहेब येंधे : काळाचौकी लालबाग परिसरामधील प्रसिद्ध असलेल्या नवबालक क्रीडा मंडळाचा ५५ व्या दत्तजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भव्य रोषणाई, महिला हळदीकुंकू समारंभ, त्याचबरोबर पाहुण्यांचे स्वागत व सत्कार यांचे आयोजन करण्यात आले होते. 



तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये रविवारी महिलांसाठी खेळ खेळूया पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन, त्याचबरोबर सोमवारी पारितोषिक वितरण समारंभ, आदर्श नागरिक पुरस्कार, सुरत्न नवबालक पुरस्कार, विद्यार्थी दत्तक योजना हे उपक्रम देखील राबवले जाणार आहेत. मंडळाचे प्रमुख विश्वस्त श्री अनिल हेलेकर यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष लक्ष्मण देवरुखकर, कार्याध्यक्ष सुनील डिचोलकर, सरचिटणीस मंगेश पिंपरकर, खजिनदार शंकर साळवी आणि स्वागताध्यक्ष योगेश राणे यांनी उत्सवाची धुरा सांभाळली. त्याचसोबत विश्वस्त अनिल घाडीगांवकर, शाम आचरेकर, प्रमोद साळवी, नरेंद्र पांगे यांचे विशेष सहकार्य लाभले.


सदर कार्यक्रमास समाजसेवक अश्विन भाऊ नाईक, शिवसेना भायखळा विधानसभा संघटक विजय लिपारे, निखिल यशवंत  जाधव-सिनेट सदस्य, मुंबई विद्यापीठ, अनिल कोकीळ नगरसेवक, समाजसेवक नरेंद्र किणी, भाजपा माजी नगरसेवक नाना आंबोले, शिवसेना नगरसेवक रमाकांत रहाटे ए, बी, ई प्रभाग समिती अध्यक्ष, विजय कामतेकर, उपविभाग प्रमुख, बबन गावकर, रमेश रावल, हेमंत प्रभू, यांची उपस्थिती लाभली.
































कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज