ठाण्यात बिबट्याचे दर्शन - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

शनिवार, १८ डिसेंबर, २०२१

demo-image

ठाण्यात बिबट्याचे दर्शन

 पोखरण रोड परिसरात घबराट

येऊरच्या पायथ्याशी असलेल्या पोखरण नं.१ येथील देवदयालनगरमधील एका सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याचा वावर कैद झाल्याची घटना गुरुवारी रात्री समोर आली आहे. बिबट्याचे दर्शन झाल्याने त्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. ठाणे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन नागरिकांना खबरदारीच्या सूचना केल्या आहेत. 

गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास उन्नती गार्डनच्या सोसायटी कॅमेऱ्यात बिबट्या त्या सोसायटीच्या आवारात फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्या बिबट्याने कोणालाही दुखापत केली नाही. बिबट्याची माहिती मिळताच वर्तकनगर पोलीस कर्मचारी, वनविभागाचे अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

.com/img/a/

.com/img/a/






Photo:viral

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *